अ‍ॅपशहर

​ वेलिंगकरमध्ये कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रम

देशभरातील तरुण पिढीला कृषी आणि ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्राकडे वळवण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमातून आधुनिक शेतीतंत्राकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च पुढे सरसावले आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:01 am
नेदरलँड्समधील विद्यापीठासह अॅग्रीकल्चर डेव्ह.ट्रस्टशी करार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम agriculture and rural management course in welingker institute
​ वेलिंगकरमध्ये कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रम


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

देशभरातील तरुण पिढीला कृषी आणि ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्राकडे वळवण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमातून आधुनिक शेतीतंत्राकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च पुढे सरसावले आहे. वेलिंगकर इन्स्टिट्यूट, नेदरलँड्सची व्हीएचएल युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस तसेच बारामतीस्थित अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात सोमवारी विशेष करार करण्यात आला. याअंतर्गत लवकरच या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार आणि व्हीएचएल युनिव्हर्सिटीच्या डेल्टा एरियाज अॅण्ड रिसोर्सेसचे संचालक डॉ. हॅरी ऑन्कॉन यांनी या त्रिपक्षीय इरादापत्रावर सोमवारी स्वाक्षरी केली. यावेळी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ नीलेश नलावडे, व्हीएचएल युनिव्हर्सिटीच्या प्रा. मरीस, श्रीतनु चॅटर्जी, शि.प्र.मंडळीचे विश्वस्त उपस्थित होते.

या उपक्रमातून राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषीविषयक उद्योग-व्यवसायाचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल, असा विश्वास अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केला. एसपी मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना या प्रकल्पातून शिक्षण-प्रशिक्षण व संशोधनाच्या संधी मिळतील. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संबंधही दृढ होतील, कृषीक्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या स्टार्ट-अप संस्कृतीलाही नवी ऊर्जा मिळेल.’ ‘एडीटी आणि व्हीएचएल विद्यापीठातील शिक्षण आणि प्रत्यक्ष कार्यानुभवातून आपल्या विद्यार्थ्यांना कृषी, ग्रामीण भागाच्या समस्या, तिथे आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवू पाहणारे राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, कृषीव्यवसाय, कृषीउत्पादन, अन्नप्रक्रिया, पुरवठासाखळ्या, आर्थिक व्यवहार यांना परिचय होऊन ते अधिक सक्षम होतील. यातून त्यांच्यासाठी करिअरचे नवे मार्ग खुले होतील,’ असे वीस्कूलचे समूह संचालक प्रा. डॉ. उदय साळुंखे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज