अ‍ॅपशहर

पुन्हा राज्यात एअर डेक्कनची सेवा सुरु

वैमानिकांचा तुटवडा आणि विमानांच्या समस्या यामुळे गेल्या महिनाभरापासून सेवा बंद ठेवलेल्या एअर डेक्कन विमान कंपनीने राज्यात पुन्हा विमानसेवा सुरू केल्याचे जाहीर केले आहे. एअर डेक्कनने आपली सेवा केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत डिसेंबर २०१७मध्ये सुरू केली होती.

Maharashtra Times 30 Jul 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम daccan

वैमानिकांचा तुटवडा आणि विमानांच्या समस्या यामुळे गेल्या महिनाभरापासून सेवा बंद ठेवलेल्या एअर डेक्कन विमान कंपनीने राज्यात पुन्हा विमानसेवा सुरू केल्याचे जाहीर केले आहे. एअर डेक्कनने आपली सेवा केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत डिसेंबर २०१७मध्ये सुरू केली होती.

पुन्हा सेवा सुरू केल्यानंतर या विमान कंपनीने नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव व कोल्हापूर या शहरांना जोडण्यासाठी विमानोड्डाणे सुरू केली आहेत. यासंदर्भात माहिती देताना एअर डेक्कनचे व्यवस्थापकीय संचालक शैशव शहा यांनी उडान योजनेची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसाला विमानप्रवास करता यावा, यासाठी अत्यंत उपयुक्त योजना सुरू केल्याचे शहा म्हणाले.

पाच वर्षांच्या अवकाशानंतर २०१७मध्ये सुरू झालेल्या एअर डेक्कनला उडान योजनेअंतर्गत लावल्या गेलेल्या पहिल्या बोलीत ३४ हवाईमार्ग सेवा देण्यासाठी मिळाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज