अ‍ॅपशहर

Mumbai Airport: मोठी बातमी : मुंबई विमानतळावरील सर्व व्यवहार अचानक ठप्प, कारण अस्पष्ट

Mumbai Local News : मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व कामकाज व व्यवहार ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. विमानतळाचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन झाल्याने प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम थांबलं आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2022, 7:52 pm
मुंबई : मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व कामकाज व व्यवहार ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. विमानतळाचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन झाल्याने प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम थांबलं आहे. काम ठप्प झाल्याने प्रवाशांची तपासणी, बॅगेज काऊंटर, चेक इन, बोर्डिंग पास देणे सारे काही थांबलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Chhatrapati Terminus Airport
Mumbai Airport: मोठी बातमी : मुंबई विमानतळावरील सर्व व्यवहार अचानक ठप्प, सायबर हल्ल्याचा संशय


विमानतळाबाहेरील विकास कामाचा अंतर्गत नेटवर्कला फटका बसला आहे. त्यामुळे चेक इन काऊंटर्स ठप्प झाले आहेत. परंतु अतिरिक्त काऊंटर्स सुरू करुन मॅन्युअल चेक इन सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांना सहकार्याचे आवाहन – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, विमानतळाचे सर्व्हर सुमारे अडीच तासांनी सुरू झाले आहे. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे टाटा फायबर केबल कापली गेल्यामुळे डेटा ठप्प झाला होता.

महत्वाचे लेख