अ‍ॅपशहर

गरज जीएसटी नसलेल्या पर्यायाची!

परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्सवर जीएसटी करांचे ओझे कायम आहे, त्यामुळे खिशाला भुर्दंड देऊन महागडे पॅड्स विकत घेण्याऐवजी मासिक पाळीच्या दरम्यान मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय उपलब्ध आहे. सोपा, आर्थिकदृष्ट्या सुसह्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीएसटी कराच्या ओझ्यातून मुक्त असलेल्या या कपाचा वापर डोळसपणे करण्याची गरज आहे. शहरातील बहुसंख्य शिक्षित महिलांसुद्धा या कपविषयी मनात असलेल्या गैरसमजुतीमुळे हा कप वापरण्यास बिचकतात.

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 14 Nov 2017, 3:00 am
मेन्स्ट्रुअल कपबद्दल सजगता निर्माण करण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alternate to sanitery pads
गरज जीएसटी नसलेल्या पर्यायाची!


मुंबई : परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्सवर जीएसटी करांचे ओझे कायम आहे, त्यामुळे खिशाला भुर्दंड देऊन महागडे पॅड्स विकत घेण्याऐवजी मासिक पाळीच्या दरम्यान मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय उपलब्ध आहे. सोपा, आर्थिकदृष्ट्या सुसह्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीएसटी कराच्या ओझ्यातून मुक्त असलेल्या या कपाचा वापर डोळसपणे करण्याची गरज आहे. शहरातील बहुसंख्य शिक्षित महिलांसुद्धा या कपविषयी मनात असलेल्या गैरसमजुतीमुळे हा कप वापरण्यास बिचकतात. पण लातूरमधील पाच ग्रामीण मुलींनी मात्र हा टॅब्यू मोडून काढला आहे. हे कप वापरणे सुरक्षित असून पॅडच्या वापरापेक्षाही याचा वापर अधिक आरामदायी असल्याचे स्वानुभावाच्या आधारे त्या सांगतात.

परदेशातून आयात केले जाणारे नॅपकिन मोठ्या प्रमाणात भारतात वापरण्यात येतात. तरीही ते जीएसटीच्या करातून मुक्त नाहीत. अशा वेळी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेल्या इतर पर्यायी गोष्टींचा वापर डोळसपणे करायला हवा, असा आग्रह या पाचहीजणी व्यक्त करतात. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या मदतीने या कपचे महत्त्व त्या लवकरच राज्यातील मुलींना सांगणार आहे. या कपविषयी भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमजुती आहेत.

या कपच्या वापरामुळे कौमार्य संपुष्टात येईल ही आपल्याकडची सर्वात प्रबळ समजूत. वर्षोनुवर्ष कौमार्य जपण्याचं बंधन लादलेल्या मुली त्याच दुष्टचक्रात अडकून हा कप वापरण्यासाठी पुढे येत नाहीत. लघवी आणि शौचाच्या वेळी हा कप काढण्याची गरज नसते. गर्भाशयाच्या मार्गामध्ये अलगदरित्या हा कप सहज सरकवता येतो व काढताही येतो. गरम पाण्याने या कपचे निर्जंतुकीकरण करावे लागते. या कपच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. पाचशे रुपयांचा कप हा उत्पादकांनी दिलेल्या खात्रीनुसार किमान दहा वर्षे वापरता येतो. सरकारने शाळेत पुरवण्यासाठी दिलेल्या सॅनेटरी पॅडससाठी महिन्याला तीनशे व वर्षाला बाराशे रुपये खर्च आहे. त्या तुलनेमध्ये कपचा खर्च हा परवडणारा आहे. जीएसटीमुक्त असल्यामुळे त्यावर अद्याप अतिरिक्त भारही लागलेला नाही.

निर्धोक वापर

हा कप गर्भाशयात अडकेल वा आतमध्ये सरकेल अशीही एक भीती अनेकींच्या मनात असते. हा कप ज्या ठिकाणी लावला जातो, त्या कर्व्हिक्सच्या पलीकडे कप जाऊ शकत नाही. शरिरात आतल्या बाजूला कप असल्याने रक्तस्त्राव जाणवत नाही, इतर कोणत्याही दैनदिन कामांमध्ये अडसरही येत नसल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनिषा एस. पाटील सांगतात.

ते दिवस सोपे झाले!

ग्रामीण भागामध्ये शाळा दूरच्या अंतरावर आहेत. शाळेत पोहचण्यासाठी सकाळी तास दीड तास आधी पोहचावे लागते. अनेकदा चालतच हे अंतर कापावे लागते. मासिक पाळीच्या दिवसांत कपडा वापरला तर जीव नकोसा होतो, पॅडच्या किंमती वाढल्यामुळे आई-वडिलांकडे वेगळे पैसे मागण्याचीही हिंमत होत नाही. या कपच्या वापरामुळे त्या दिवसातले अवघडलेपण निघून तर गेलेच शिवाय पैसे खर्च करण्याचा प्रश्नही सुटला.

( वर्षा शिंदे, प्राजक्ता कवे, राजश्री कांबळे, जयश्री रणदिवे )

क्रमशः
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज