अ‍ॅपशहर

मुंबईसारख्या ठिकाणी २६/११ हल्ला झालाच कसा?

मुंबईत नौदलाचे संपूर्ण कमांड तसेच तटरक्षक दलाचे स्वतंत्र कमांडस्तरीय केंद्र असतानाही मुंबईसारख्या ठिकाणी २६/११चा हल्ला झालाच कसा? याची उत्सुकता अमेरिकी विद्यार्थ्यांना आहे. या उत्सुकतेपोटी अमेरिकेतील काही विद्यार्थी या हल्ल्याचा अभ्यास करणार आहेत. यासाठी हे विद्यार्थी पुढील महिन्यात मुंबईत येऊन नौदल व तटरक्षक दलातील तज्ज्ञांना भेटतील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2019, 2:10 am
chinmay.kale@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai-attacks


@ChinmaykaleMT

मुंबई : मुंबईत नौदलाचे संपूर्ण कमांड तसेच तटरक्षक दलाचे स्वतंत्र कमांडस्तरीय केंद्र असतानाही मुंबईसारख्या ठिकाणी २६/११चा हल्ला झालाच कसा? याची उत्सुकता अमेरिकी विद्यार्थ्यांना आहे. या उत्सुकतेपोटी अमेरिकेतील काही विद्यार्थी या हल्ल्याचा अभ्यास करणार आहेत. यासाठी हे विद्यार्थी पुढील महिन्यात मुंबईत येऊन नौदल व तटरक्षक दलातील तज्ज्ञांना भेटतील. मुंबईवर झालेल्या या हल्ल्याने समुद्री सुरक्षेसमोर आव्हान उभे केले होते. या हल्ल्याचा अशाप्रकारचा अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच होत आहे.

हे सर्व विद्यार्थी यूएस युनिव्हर्सिटीचे असून ३१ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान ते मुंबईत असतील. यादरम्यान ते या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी, हल्ल्याचे विस्तृत वार्तांकन केलेले पत्रकार, नौदल तसेच पोलिस दलातील आजी-माजी उच्चाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. नौदलातील सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेलादेखील भारताप्रमाणे अथांग सागरी किनारा लाभला आहे. अमेरिकेवरही याआधी दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे मुंबईप्रमाणे हल्ला तिथेही होऊ शकतो. हा हल्ला कसा होऊ शकतो किंवा हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची नेमकी प्रक्रिया कशी असावी, हे जाणून घेण्यासाठी अमेरिकी विद्यार्थी मुंबईत येत आहेत. हे विद्यार्थी २६/११ हल्ल्याच्या आधीची भारतीय समुद्री सुरक्षा व हल्ल्यानंतर या सुरक्षेत केलेले बदल, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करतील. प्रत्यक्ष समुद्रात जाऊन हा हल्ला नेमका कसा झाला, कुठून झाला, त्यावेळची समुद्राची स्थिती आदी सर्व माहिती घेणार आहेत.

कारगिल युद्धही घेणार जाणून

मुंबईसारख्या ठिकाणी २६/११चा हल्ला झालाच कसा? या उत्सुकतेपोटी अमेरिकेतील काही विद्यार्थी या हल्ल्याचा अभ्यास करणार आहेत. मुंबईवर झालेल्या या हल्ल्याने समुद्री सुरक्षेसमोर आव्हान उभे केले होते. हे सर्व विद्यार्थी यूएस युनिव्हर्सिटीचे आहेत. अमेरिकी विद्यार्थ्यांचा हा अभ्यास दौरा यूएस युनिव्हर्सिटीच्या विनंतीवरून संरक्षण मंत्रालयाने आयोजित केला आहे. भूदल त्याचे पूर्ण व्यवस्थापन करणार आहे. यादरम्यान हे विद्यार्थी कारगिल युद्धाचा अभ्यासही करतील. कारगिल युद्ध नेमके का घडले, त्याची पार्श्वभूमी, युद्धात नेमके काय झाले, याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मुंबईनंतर दिल्लीला जातील. कारगिल युद्धाचे वार्तांकन केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना ते भेटतील. तसेच त्यांना कारगिलमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नेण्याचाही भूदलाचा प्रयत्न आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज