मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आधीच शिवसेनेत फूट पडली असताना आता युवासेनातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. युवासेना कोषाध्यक्ष अमेय घोले यांची युवासेना कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थितीने चर्चांना उधाण आलं आहे. बैठकीचे निमंत्रण असूनही अमेय घोले अनुपस्थित राहिल्याने वेगवगेळ्या चर्चा सुरू आहे. अमेय घोले हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. शिवसेना सचिव आणि युवा कार्यकारणी सदस्य सुरज चव्हाण हे माजी नगरसेवक अमेय घोले यांना वारंवार बैठकीतून कार्यक्रमातून डावलत असल्याचा आरोप आहे. सुरज चव्हाण यांच्या विरोधात अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर तीव्र नाराजी मांडल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे युवासेनेच्या कार्यकारणी बैठकीत अमेय घोले गैरहजर राहिल्याने पुन्हा एखादा चर्चांना उधाण आले आहे.
अनेक दिवसांपासून अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींवर नाराज आहेत. ही नाराजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली आहे. तरीही याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. या व्यक्तींमुळे युवासेनेचं नुकसान होत असल्याचं अमेय घोले यांचं म्हणणं आहे.
अमेय घोले यांनी युवासेनेचे व्हॉट्सॲप ग्रुप देखील लेफ्ट केले आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे.
अमेय घोले यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर आणि महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाला शुभेच्छा देताना मशाल चिन्ह किंवा शिवसेना नावाचा उल्लेख केलेला नाही. यामुळे अमेय घोले हे शिंदे गटात जाणार, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
अमेय घोले शिंदे गटात जातायत का, आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले....
अमेय घोलेंबाबत काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
गणेशोत्सवादरम्यान अमेय घोले यांनी वडाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले होते. तेव्हापासून अमेय घोले हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही आदित्य ठाकरे यांना अमेय घोले यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अमेय घोले यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबतचा दावा त्यावेळी फेटाळून लावला होता. अमेय घोले माझ्यासोबतच असतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे गट पदाधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात