अ‍ॅपशहर

sushantsingh rajput : सुशांतसिंह आत्महत्या: राजकारण तापलं; अमृता फडणवीसांनी केलं 'हे' ट्विट

राज्य सरकारमधील एक युवा मंत्री सुशांतसिंह (sushantsingh rajput)आत्महत्या प्रकरण दडवत असल्याचा आरोप होत असतानाच अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर ट्विट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2020, 2:20 pm
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून राजकारण सुरू असतानाच आता या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. सुशांतसिंह राजपूतचं प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतंय, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amruta fadnavis-sushant singh


अमृता फडणवीस यांनी ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच जस्टीस सुशांत सिंग राजपूत आणि जस्टिस फॉर दिशा सालियन असा हॅशटॅगही त्यांनी चालवला आहे.


राज्य सरकारमधील एक युवा मंत्री सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण दडवत असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतरच अमृता फडणवीस यांनी हे ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमृता फडणवीस यांना नेमका निशाणा कुणावर साधायचा आहे? यावरही तर्क व्यक्त केले जात आहेत.

vinay tiwari : बिहार पोलीस अधीक्षकाचे अलगीकरण योग्यच; मुंबई महापालिका ठाम

काय आहे प्रकरण?

बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे काल रविवारी पटना येथून मुंबईत तपासासाठी आले होते. ही माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी काल रात्री ११ वाजता तिवारी यांना गोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच तिवारी यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्काही मारण्यात आला आहे. दरम्यान, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई आणि बिहार पोलिसांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.


सुशांतसिंह आत्महत्या: महाराष्ट्र सरकारला कोणतं सत्य दडवायचंय; भाजपचा सवाल

तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं ट्विट पांडेय यांनी केलं होतं. त्यानंतर मीडियाने तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता मला क्वॉरंटाइन करण्यात आलं असून माझ्या टीमशी मी फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच संपर्क साधू शकलो आहे. महाराष्ट्र सरकारची ऑर्डर दाखवल्यानंतर मला क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. मात्र, मी मुंबई विमानतळावर आल्यावर माझी कोणीही करोनाची चाचणी केली नाही किंवा त्यासंदर्भात माझी चौकशीही केली नाही. माझा करोना स्वॅबही घेण्यात आलेला नाही. मी ड्युटीवर आहे. त्यामुळे मला यातून सूट द्यायला हवी. मी १४ दिवस क्वॉरंटाइन राहिल्यास या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होईल, असं तिवारी यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबई महापालिकेने तिवारी यांना क्वॉरंटाइन केल्याने बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी आज दुपारी २ वाजता बिहार पोलिसांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

सुशांतसिंह प्रकरण: मुंबईत येताच बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला पालिकेने केलं क्वॉरंटाइन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज