अ‍ॅपशहर

जातीय दंगली घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव, आनंदराज आंबेडकरांचा आरोप

धार्मिक स्थळांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात जातीय आणि धार्मिक दंगली घडण्याची भीती आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. यावरून

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 May 2022, 4:14 pm
मुंबई : केंद्र सरकारमधील सत्ताधाऱ्यांकडून विशिष्ट जाती-धर्माच्या नागिराकांना जाणीपूर्वक लक्ष्य केलं जात आहे. तसेच देशात एकमेकांची प्रार्थना स्थळे बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे, असा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. असे स्वार्थी खेळ करणाऱ्या प्रवृत्तींचा आणि राजकारण्यांचा रिपब्लिकन सेनेने निषेध केला आहे. अशा खेळीमुळेच देशामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडतील, अशी भीती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर त्यांनी हे आरोप केले आहेत. जनतेशी निगडीत असलेल्या मुद्द्यांवर आवाज उठवणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anandraj ambedkar criticism on gyanvapi mosque
जातीय दंगली घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव, आनंदराज आंबेडकरांचा आरोप


रिपब्लिकन सेनेची २ जूनला 'भाईचारा शांती रॅली'

सर्व समाजात, जाती-धर्मांमध्ये शांतता आणि सलोखा राहावा यासाठी रिपब्लिकन सेनेकडून रॅली काढण्यात येणार आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या जन्मदिनी रिपब्लिकन सेनेतर्फे मुंबईत २ जूनला 'भाईचारा शांती रॅली' काढण्यात येणार आहे. ही रॅली माहिम दर्गापासून सुरू होईल आणि माहिम चर्च, शितला देवी मंदिर, दादर चैत्यभूमी आणि दादर गुरुद्वारा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपर्यंत असेल, अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रॅलची रुपांतर जाहीर सभेत होईल. प्रार्थना स्थळांवर जाऊन प्रार्थना करण्यात येईल. राजकारण्यांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि देशातील मूळ प्रश्न वाढती महागाई आणि बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी सद्बु्धी मिळावी असा संदेश या रॅलीतून दिला जाणार आहे, असं आंबेडकरांनी सांगितलं.

'एक कुटुंब, एक तिकीट', राज्यातही प्रदेश काँग्रेस अंमलबजावणी करणार

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समविचारी पक्षांसोबत लढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अनेक राजकीय पक्षातून समाजवेक आणि पदाधिकारी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करत आहेत. समाजवेसक प्रकाशभाऊ खंडागळे यांच्यासह विनोद काळे, आनंद मोहन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पक्षात सहभागी होत आहे, असा यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केला.

महत्वाचे लेख