अ‍ॅपशहर

संतप्त पतीने पत्नीला लोकलमधून फेकले

पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरूनचा वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला धावत्या रेल्वेतून खाली फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे.

Maharashtra Times 26 Feb 2017, 2:44 am
suraj.sawant @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम angry husband threw his wife from local train
संतप्त पतीने पत्नीला लोकलमधून फेकले


Tweet : @SSawantMT

मुंबई : पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरूनचा वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला धावत्या रेल्वेतून खाली फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत सुनिता रोकडे ही महिला जखमी झाली आहे. दुर्घटनेप्रसंगी रेल्वे बलाच्या राधेश्याम गुर्जर यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे रोकडे यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे डॅाक्टरांकडून सांगण्यात आले.

रबाळेमध्ये सुनिता दोन मुले आणि नवरा अब्दुल हमीद शेख याच्यासोबत मागील तीन वर्षांपासून राहते. सुनिताचे यापूर्वीही एक लग्न झाले असून तिला पाच मुले आहेत. मात्र नवऱ्याशी न पटल्याने सुनिता कालांतराने दोन मुलांसह वेगळी राहत होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तिने अब्दुल शेख याच्याशी दुसरे लग्न करून ती रबाळे येथे राहत होती. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला शेख वारंवार सुनिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. शुक्रवारी सायंकाळी घणसोली येथून कामावरून सुटलेल्या सुनिताचा अब्दुलने पाठलाग केला. त्यावेळी घरी परतताना दोघेही ठाण्याला जाणाऱ्या एकाच लोकलमध्ये चढले. रेल्वेच्या दरवाजातच दोघांचे भांडण सुरू होते. त्यावेळी राग अनावर झालेल्या अब्दुलने धावत्या लोकलमधून सुनिताला ढकलून दिले. रेल्वेतील इतर प्रवाशांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. त्याचवेळी रबाळे स्थानकावर अब्दुलने धावत्या रेल्वेतून उडी टाकून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला रेल्वे सुरक्ष बलाच्या हवाली करत घडलेला प्रकार सांगितला. घणसोली स्थानकात गस्तीवर असलेले रेल्वे बलाचे शिपाई राधेश्याम गुर्जर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी महिला जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुर्जर यांनी क्षणाचाही विचार न करता, ठाण्याला जाणाऱ्या रेल्वेच्या पटरीवर उभे राहून रेल्वे थांबवली. त्याच रेल्वेतून जखमी सुनिताला रबाळे स्थानकावर नेले. रबाळे स्थानकावरून राधेश्यामने सुनिताला रिक्षाने जवळील शासकीय रुग्णालयात दाखल केले. ५ तास बेशुद्ध असलेल्या सुनिताला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले असून आयसीयूत उपचार सुरू आहेत. अब्दुलला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज