अ‍ॅपशहर

खडसेंचा बुधवारपर्यंत राजीनामा घ्याः अंजली दमानिया

राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा मी उपोषणाला बसेन, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Maharashtra Times 30 May 2016, 8:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anjali damania on target khadse
खडसेंचा बुधवारपर्यंत राजीनामा घ्याः अंजली दमानिया


राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा मी उपोषणाला बसेन, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारला दिला आहे.

गेल्या काही दिवसापासून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. पीए गजानन पाटील लाच प्रकरण, भोसरीतील जमीन प्रकरण, जावयाची अलिशान गाडी प्रकरण यासारख्या प्रकरणाशी संबंधावरुन खडसे वादात सापडले आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्र्यांनी पाठिशी न घालता त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारपर्यंत राजीनामा घेतला नाही तर आपण उपोषणाला बसू, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.

महसूलमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून खडसे वादात अडकले असून त्याची गंभीर दखल भाजप पक्षश्रेष्ठींने घेतली आहे. खडसे यांच्या मंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सांगताच एकनाथ खडसे यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली. दरम्यान, राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून या विस्तारावेळी ख़डसेंच्या महसूलमंत्रीपदाचा भार काढून घेण्यात येणार अशी शक्य़ता वर्तवली जात आहे. खडसेंप्रकरणी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे अनेकांचं लक्ष्य लागलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज