अ‍ॅपशहर

आर्यन खानला दुसरा धक्का! २६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच राहावं लागणार

एनडीपीसी कोर्टानं जामीन नाकारताच मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतलेल्या आर्यन खान (Aryan Khan Bail Plea) याच्या जामिनावर येत्या २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2021, 11:57 am
मुंबई: ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळं त्याला आणखी काही दिवस कोठडीतच राहावं लागणार आहे. (Bombay high court to hear Aryan Khan's bail plea on october 26)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aryan Khan
आर्यन खान


वाचा: आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान ऑर्थर रोड जेलमध्ये; काही मिनिटांची भेट

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीनं केलेल्या कारवाई दरम्यान २ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो एनसीबीच्या कोठडीत आहे. दरम्यान एनडीपीएस कोर्टात त्यानं जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर दोनदा सुनावणी घेतल्यानंतर बुधवारी निर्णय देताना न्यायालयानं आर्यनला जामीन नाकारला. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळताच आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. विषय महत्त्वाचा आल्यानं उद्या (शुक्रवार) किंवा सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी', अशी विनंती आर्यनतर्फे ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांना केली. मात्र, न्या. सांब्रे यांनी ती मान्य केली नाही आणि सुनावणीसाठी मंगळवार, २६ ऑक्टोबरची तारीख दिली.

वाचा: ड्रग्जविषयी आर्यन खाननं केली होती एका अभिनेत्रीशी चर्चा; व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोर्टापुढे

दरम्यान, आज आर्यन खानसह अनेकांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती एनसीबीतर्फे एनडीपीएस न्यायालयात करण्यात येण्याची शक्यता आहे.

शाहरुख खाननं घेतली आर्यनची भेट

गेल्या १७ दिवसांपासून कोठडीत असलेल्या आर्यनची शाहरुख खाननं आज ऑर्थर रोड कारागृहात जाऊन भेट घेतली. १५ ते २० मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. आर्यनच्या भेटीनंतर शाहरुखची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मीडियानं त्याला गराडा घातला. पण त्यानं मौन बाळगणं पसंत केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज