अ‍ॅपशहर

अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?': भाजप

अर्णब गोस्वामींच्या (Arnab Goswami) अटकेवरून ठाकरे सरकारला घेरणाऱ्या भाजपला 'सामना'च्या अग्रलेखातून धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता भाजपनंही शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2020, 2:54 pm
मुंबईः रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर टीका केल्यानंतर आता आशिष शेलार यांनीही संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut


अर्णब गोस्वामी यांस एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. त्यांच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत. त्यामुळं एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा. तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील, अशी टीका शिवसेनेनं केली होती. शिवसेनेच्या या टीकेचा आशिष शेलार यांनीही समाचार घेतला आहे.

'त्या' पोलिसांचं निलंबन करा; भाजप आमदारानं घेतली राज्यपालांची भेट

'त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांनी खोटे ठरवून आता एका 'सिंह' यांना 'परमवीर' का देताय? असा सवाल करत खरी नौटंकी तर हीच आहे, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे. शिवाय, एका युवराजाला वाचवण्यासाठी महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?,' असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेच्या अग्रलेखावर हल्लाबोल चढवला आहे.


'रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा. अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन दिशा सालीयनबाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी....,'असा इशाराच शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.


पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा आरोप; खरं काय?

गोस्वामींना भेटायला गेलो असताना पोलिसांनी मला बाजूला काढलं; किरीट सोमय्यांची तक्रार

अर्णब आमचा पोपट नाही, पोपट पाळण्याची सवय त्यांनाच; भाजपचा पलटवार

    महत्वाचे लेख

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
    ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज