अ‍ॅपशहर

'आसाम बचाओ'ला हवंय राज यांचं बळ!

आसाममधील स्वाधीन नारी शक्ती संघटनेच्या प्रतिनिधींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी आसाममध्ये आसामी भाषेची, आसामी संस्कृतीची सुरु असलेली गळचेपी, शेजारच्या प्रदेशांतून होणारी घुसखोरी आणि या परप्रांतीयांनी उद्योगधंद्यावर केलेला कब्जा याविषयी राज यांना माहिती दिली.

Maharashtra Times 14 Jul 2017, 5:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम assam swadhin nari shakti members meets raj thackeray in mumbai
'आसाम बचाओ'ला हवंय राज यांचं बळ!


आसाममधील स्वाधीन नारी शक्ती संघटनेच्या प्रतिनिधींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी आसाममध्ये आसामी भाषेची, आसामी संस्कृतीची सुरु असलेली गळचेपी, शेजारच्या प्रदेशांतून होणारी घुसखोरी आणि या परप्रांतीयांनी उद्योगधंद्यावर केलेला कब्जा याविषयी राज यांना माहिती दिली. तसेच सप्टेंबर महिन्यांत आसामला भेट देऊन 'आसाम बचाओ आंदोलना'ला पाठिंबा द्यावा व मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. विशेष म्हणजे शिष्टमंडळातील महिलांनी राज यांना राखी बांधून बहिणीच्या हक्काने भाषिक अस्मितेच्या लढ्यासाठी साथ मागितली.

भाषिक अस्मिता आणि स्थानिकांचा रोजगाराचा अधिकार यावर स्वातंत्र्योत्तर काळांत देशातल्या अनेक राज्यांत वारंवार संघर्ष सुरु आहे. महाराष्ट्रात गेली ११ वर्षे राज ठाकरे मराठी अस्मिता आणि स्थानिक रोजगारावरील मराठी माणसाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. याचे कुतूहल देशातल्या अनेक राज्यात भाषिक अस्मितेसाठी सुरु असणाऱ्या चळवळींच्या नेतृत्वाना आहे आणि या घडीला या प्रश्नावर राज हेच नेतृत्व देऊ शकतात याची खात्री आम्हाला वाटत असल्याचं मत यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केलं.

दरम्यान, याआधी 'कन्नड रक्षण वेदिका' या कर्नाटकमधील संघटनेनेही केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात होणाऱ्या चर्चासत्रात मनसेला पाचारण केलं आहे. राज यांनी या चळवळीचं देशव्यापी नेतृत्व करावं अशी विनंतीही करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज आसाममधील स्त्रियांनी भेट घेऊन आसामी भाषेच्या रक्षणासाठी, स्थानिक आसामींच्या रोजगारासाठी सुरु असलेल्या लढ्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती केल्याने देशपातळीवर ही नव्या आंदोलनाची नांदी मानली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज