अ‍ॅपशहर

भाजप नेते राजन तेली यांच्या मुलावर हल्ला

भाजप नेते राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर रेल्वे स्थानकात प्राणघातक हल्ला झाला आहे. दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र.५ वर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ए १ बोगीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. हल्ल्याचे वृत्त समजताच राजन तेली मुंबईसाठी रवाना झालेत. या हल्ल्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

Maharashtra Times 18 Jan 2017, 2:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम attack on bjp leader rajan teli son prathamesh in dadar
भाजप नेते राजन तेली यांच्या मुलावर हल्ला


भाजप नेते राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर रेल्वे स्थानकात प्राणघातक हल्ला झाला आहे. दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र.५ वर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ए १ बोगीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. हल्ल्याचे वृत्त समजताच राजन तेली मुंबईसाठी रवाना झालेत. या हल्ल्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

कणकवलीला येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये प्रथमेश चढत असताना दोघा हल्लेखोरांनी त्याला खेचले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चालत्या गाडीतून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रथमेशने आरडाओरड केल्याने झालेल्या गर्दीमुळे तो बचावला. मारहाणीत प्रथमेशचा हात जायबंदी झाला आहे. पळणाऱ्या दोघा हल्लेखोरांपैकी एकाला पोलिसांनी रेल्वे स्थानकातच पकडले. तर दुसरा हल्लेखोर निसटला. प्रवीण खरात (रा.चेंबूर) असे पकडलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. या प्रकरणी दादर लोहमार्ग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. यामुळे दुसरा हल्लेखोर लवकरच सापडेल असा दावा करण्यात येतोय. राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या आणि राजन तेली यांची व्यावसायिक बाजू सांभाळणाऱ्या प्रथमेशवरील हल्ल्याने सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज