अ‍ॅपशहर

सरकारी योजनांचे त्रयस्थ ऑडिट

मुंबई: राज्य सरकारकडून सर्वसामान्यांच्या हितासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्याचा जनतेला खरंच फायदा होतो की, मधल्या मध्ये काहीजण स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात, हे तपासण्यासाठी सरकारनेच आता त्रयस्थ संस्था नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘थर्ड पार्टी ऑडिट’मधून योजनांचा खर्च नेमका कसा करावा याचा ताळेबंद तयार होईलच. शिवाय, या संस्थांनी तयार केलेल्या प्रगतीपुस्तकात ज्या विभागाचे अधिकारी ‘अव्वल’ ठरतील त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून उच्च शिक्षणासाठी परदेश दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे

Maharashtra Times 19 Nov 2016, 2:46 am
sanjay.vhanmane@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम audit of goverment scheme by agency
सरकारी योजनांचे त्रयस्थ ऑडिट


sanjay.vhanmane@timesgroup.com

Tweet : @vsanjayMT

मुंबई: राज्य सरकारकडून सर्वसामान्यांच्या हितासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्याचा जनतेला खरंच फायदा होतो की, मधल्या मध्ये काहीजण स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात, हे तपासण्यासाठी सरकारनेच आता त्रयस्थ संस्था नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘थर्ड पार्टी ऑडिट’मधून योजनांचा खर्च नेमका कसा करावा याचा ताळेबंद तयार होईलच. शिवाय, या संस्थांनी तयार केलेल्या प्रगतीपुस्तकात ज्या विभागाचे अधिकारी ‘अव्वल’ ठरतील त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून उच्च शिक्षणासाठी परदेश दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे.सरकारी योजनांचा निधी नेमका कशाप्रकारे खर्च होत आहे आणि त्यातून काय फायदा होतो याचा ताळेबंद तयार झाल्यास संबंधित खर्चाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य आहे. त्यामुळे वित्त विभागाने प्रत्येक खात्याच्या कामगिरीचे मोजमाप करण्याचे ठरवले आहे. यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येणार असून या संस्थांमध्ये ‘अ’ दर्जाची विद्यापीठे, राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या संस्था ‌किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीच्या संस्थांचा सहभाग असेल. वित्त विभागातील प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील एक समिती या निविदा काढून त्रयस्थ संस्था निवडणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज