अ‍ॅपशहर

१ मे रोजी लसीकरण कसं होणार?; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळं लसीकरण मोहिम राबवताना अडचणी येत आहे. (corona vaccination)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2021, 4:20 pm
मुंबईः लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळं काही ठिकाणी लसीकरणासाठी अडथळे येत आहेत. १ मेपासून लसीकरणाचा पुढील टप्पा सुरु होत असून १८ वर्षांवरील वयोगटाचं लसीकरण सुरु होणार आहे. मात्र, लसीकरण सुरु होण्यापूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajesh tope


लसच नसेल तर लसीकरण कसं सुरु होणार हा सर्वच राज्यांपुढचा प्रश्न आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण लसच नसेल तर लसीकरण कसं करणार?, अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी लसी आयात करण्याचा आमचा विचार आहे. लसींचे योग्य वितरण झाल्यास व्यापक लसीकरण करता येईल, असं राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.

जिद्दीला सलाम! १०५ वर्षांच्या आजोबांची अवघ्या ९ दिवसांत करोनावर मात

मोफत लसीकरणाचा अहवाल आरोग्य विभागानं कॅबिनेटला दिला आहे. उद्या कॅबिनेटची बैठक होईल. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. लसीकरणाचा निर्णय आधीच जाहीर करणं योग्य नाही, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यात मोफत लसीकरण? अजित पवार म्हणाले...

दीड कोटी लसीकरण पूर्ण

दरम्यान, करोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी झाली असून लसीकरणात दीड कोटींचा टप्पा राज्यानं गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

तर, मतभेद विसरुन पंतप्रधान मोदींसोबत उभं राहायला हवंः संजय राऊत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज