अ‍ॅपशहर

मी काय वाचतो- अविनाश पाटील

मोहनदास करमचंद गांधी महात्मा झाले नसताना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांबद्दल निर्भयपणे आणि निरपेक्षपणे लिहिण्याची हिम्मत दाखवली. हा त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रही भूमिकेचा पाया ठरला.

Maharashtra Times 15 Oct 2018, 3:00 am
मोहनदास करमचंद गांधी महात्मा झाले नसताना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांबद्दल निर्भयपणे आणि निरपेक्षपणे लिहिण्याची हिम्मत दाखवली. हा त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रही भूमिकेचा पाया ठरला. 'गांधी हा माणूस म्हणून जन्माला आला होता यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत', अशा आशयाचे विधान शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांनी केले होते. विवेकी भूमिका अधिक सक्षम, सुस्पष्ट व विवेकीपणे मांडण्याचे काम गांधीजीच्या 'माझे सत्याचे प्रयोग'मधून ठाशीवपणे दिसते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम avinash patil shares what he reads
मी काय वाचतो- अविनाश पाटील


आपले प्रश्न आपण विधायक आणि अहिंसात्मक मार्गाने लोकसहभागाच्या माध्यमातून सोडवू शकतो, याचा वस्तुपाठ महात्मा गांधींच्या नेतृत्वाने जगाला दिलेला आहे. या आत्मकथेतून याचे प्रत्यंतर येते. सध्याच्या आणि पुढीलही पिढ्यांनी तो काळाच्या कसोटीवर नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर देश आणि जगातील मानवी समूहांना हा वस्तुपाठ प्रेरणादायी ठरू शकतो. गांधींविषयी हेतुपुरस्सर निर्माण केलेले गैरसमज आणि इतिहासाच्या घटनाक्रमांचा हितसंबंधी भूमिकेतून काढलेला अन्वयार्थ यापासून सुटका करून घेता येईल असे वाटते. आजची युवा पिढी भारताला महासत्ता आणि जगाला अधिक संपन्न नेतृत्व देणार आहे. आज 'माझे सत्याचे प्रयोग' ही आत्मकथा अधिक साक्षेपी भूमिकेतून वाचून त्यावर चर्चा करायला हवी.

-अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज