अ‍ॅपशहर

‘आत्मघातकी पथक पाकिस्तानात पाठवावे’

उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावे, ही मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची धमकी हास्यास्पद आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाकिस्तानी कलाकार मुंबईत काम करत आहेत. त्यांना धमकी देण्यापेक्षा राज यांनी आत्मघातकी पथक पाकिस्तानात पाठवावे, असे आव्हान समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी दिले.

Maharashtra Times 25 Sep 2016, 2:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम azmi vs raj
‘आत्मघातकी पथक पाकिस्तानात पाठवावे’

उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावे, ही मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची धमकी हास्यास्पद आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाकिस्तानी कलाकार मुंबईत काम करत आहेत. त्यांना धमकी देण्यापेक्षा राज यांनी आत्मघातकी पथक पाकिस्तानात पाठवावे, असे आव्हान समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी दिले.

उरी हल्ल्यामुळे भारतात पाकबद्दल संताप आहे. यात राज यांनी पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासांत भारतातून जावे, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने समाचार घेऊ असा इशारा दिला होता. त्यावर आझमी म्हणाले, राज हे छोटे नेते आहेत. ते महाराष्ट्रापुरते आहेत. त्यांचा पाकवर राग असेल तर त्यांनी आत्मघातकी पथक पाकमध्ये पाठवावे. महाराष्ट्रातल्या चंद्रपूर, गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरू आहेत. तेथे नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी आपले कार्यकर्ते पाठवावेत.

पाक कलाकार येथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आले आहेत. त्यांना धमकी द्यायची नंतर ते भेटायला आले की विषय संपावायचा, असा आरोप आझमी यांनी केला. राज यांनी आधी दिल्लीतील पाकचे दूतावास बंद करून दाखवावे, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज