अ‍ॅपशहर

संजय राऊत अडचणीत?, शिवडी न्यायालयाने काढले जामीनपात्र वॉरंट

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शिवडी येथील न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. आता राऊत यांना १८ जुलैला न्यायालयात हजर रहावं लागणार आहे. किरीट सोमय्यांच्या पत्नी दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी सुनावणी सुरू आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 5 Jul 2022, 7:57 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीच्या सुनावणीसंदर्भात हजर राहण्याचा आदेश देऊनही शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सोमवारी गैरहजर राहिल्याने शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले. त्यामुळे आता १८ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहून राऊत यांना जामीन घ्यावा लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bailable warrant against shiv sena mp sanjay raut
संजय राऊत अडचणीत!, शिवडी न्यायालयाने काढले जामीनपात्र वॉरंट


'मिरा-भाइंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभालीच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात किरीट सोमय्या व त्यांचे कुटुंबीय चालवत असलेल्या युवा प्रतिष्ठान नावाच्या स्वयंसेवी संस्थेचा सहभाग आहे, असा आरोप करून संजय राऊत यांनी माझी मानहानी केली आहे', असे म्हणत मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. युवा प्रतिष्ठान ही संस्था मेधा सोमय्या यांच्याशी संबंधित आहे.

हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणुका लावा, मग पाहू, उद्धव ठाकरेंचं सरकारला

'राऊत यांनी तक्रारदाराविरोधात काढलेले उद्गार प्रथमदर्शनी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहेत. तक्रारदाराने सादर केलेली कागदपत्रे व ध्वनिचित्रफिती पाहता तक्रारदाराची मानहानी होईल आणि नागरिकांकडून पाहिली व वाचली जाईल, अशाप्रकारचे आक्षेपार्ह शब्द आरोपीने वापरल्याचे दिसते', असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ९ जून रोजी राऊत यांना ४ जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र 'सोमवारच्या सुनावणीला राऊत किंवा त्यांचे वकीलही हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यासाठी आम्ही अर्ज दिला आणि तो न्यायालयाने मान्य केला', अशी माहिती मेधा यांचे वकील अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी दिली. पुढील सुनावणीत राऊत हजर राहिले नाहीत तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची विनंती आम्ही अर्जाद्वारे करणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

व्हिप मोडणाऱ्या १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस; फक्त एकाला वगळलं,

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज