अ‍ॅपशहर

Balasaheb Thackeray Death Anniversary Live: महाविकास आघाडीच्या नेत्यांची बाळासाहेबांना आदरांजली

Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर गर्दी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2020, 12:43 pm
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्या निमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर येण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Balasaheb Thackeray


लाइव्ह अपडेट्स:



>> विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला व्हिडिओ

>> युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

>> अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

>> भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही केले बाळासाहेबांना अभिवादन

>> महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले बाळासाहेबांना अभिवादन

>> करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

>> राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कच्या दिशेने.

>> मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी साडेअकरा वाजता सहकुटुंब शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहणार.

>> राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले बाळासाहेबांना अभिवादन

>> बाळासाहेब ठाकरे यांना राज्यभरातून आदरांजली.

>> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज