अ‍ॅपशहर

बँक कर्मचाऱ्याचे सेक्स रॅकेट

बँकेत नोकरी करतानाच एका कर्मचाऱ्याने देहविक्रय करण्याचा व्यवसाय सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसीम नाझीर खान (२६) असे या बँक कर्मचाऱ्याचे नाव असून तो चालवीत असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.

महाराष्ट्र टाइम्स 19 Oct 2019, 5:23 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बँकेत नोकरी करतानाच एका कर्मचाऱ्याने देहविक्रय करण्याचा व्यवसाय सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसीम नाझीर खान (२६) असे या बँक कर्मचाऱ्याचे नाव असून तो चालवीत असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मालाड येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी दोन परदेशी तरुणींची सुटका केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sex  racket


एका नामांकित बँकेतील कर्मचारी व्हॉट्सअपवर परदेशी तरुणीचे फोटो पाठवून पसंतीनुसार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये देहविक्रय व्यवसाय चालवीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाला मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. त्याने पाठविलेले फोटो पाहून पैसे ठरविण्यात आले. या कर्मचाऱ्याने मालाड येथील एका हॉटेलमध्ये या दोन परदेशी तरुणींना पाठवित असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला आणि दोन तरुणींची सुटका केली. तर बँक कर्मचारी नसीम खान याला अटक करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या तरुणी मूळच्या उझबेकिस्तान येथील आहेत. या दोघी भारतामध्ये फिरण्यासाठी आल्या होत्या. अशाच महिला पर्यटकांना पैशाचे आमिष दाखवून नसीम देहविक्रय करण्यास लावत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज