अ‍ॅपशहर

गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांची हवा, 'गर्व से कहो हम हिंदू हैं' बॅनर झळकले

बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो असलेले बॅनर, गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल आणि सोमनाथ मंदिरासमोरील मार्गावर दिसत आहे, जेथे महाराष्ट्राचे बंडखोर आमदार मुक्कामी आहेत. बॅनरवर "गर्व से कहो हम हिंदू हैं" आणि "शिंदे साहब हम आपके साथ हैं" असे लिहिले आहे.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2022, 10:48 pm

हायलाइट्स:

  • गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांची हवा
  • 'गर्व से कहो हम हिंदू हैं' बॅनर झळकले
  • रॅडिसन ब्लू हॉटेलसमोरील मार्गावर बॅनर्स
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Eknath shinde news
एकनाथ शिंदे यांचे गुवाहाटीमध्ये बॅनर्स
मुंबई : बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर 'भाई समर्थक' उत्साहात आहेत. इकडे ठाण्यात शिंदे समर्थकांनी रस्त्यावर फटाके फोडून, गुलाल उधळून तसेच एकमेकांना पेढे भरवून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. तर तिकडे गुवाहाटीत देखील एकनाथ शिंदे यांची हवा पाहायला मिळाली. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो असलेले बॅनर, गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल आणि सोमनाथ मंदिरासमोरील रस्यावर पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील बंडखोरीचा पेच सुप्रीम कोर्टात पोहोचलेला आहे. राज्यासह अख्ख्या देशाचं लक्ष आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे होतं. बंडखोर शिंदे गट आणि शिवसेनेच्या वतीने दिग्गज वकील कायदेशीर खिंड लढवत होते. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद पार पडला. अखेर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलासा देत १६ सदस्यांच्या अपात्रतेबाबत किमान ११ जुलैपर्यंत निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देत महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला. या निर्णयाने शिंदे गटात उत्साह आहे.


गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांची हवा

बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो असलेले बॅनर, गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल आणि सोमनाथ मंदिरासमोरील मार्गावर दिसत आहे, जेथे महाराष्ट्राचे बंडखोर आमदार मुक्कामी आहेत. बॅनरवर "गर्व से कहो हम हिंदू हैं" आणि "शिंदे साहब हम आपके साथ हैं" असे लिहिले आहे.

एकनाथ शिंदेंनी प्रस्ताव दिला नाही, दिल्यास बघू : भाजपची वेट अँड वॉचची भूमिका

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपच्या कोअर टीमची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील सुधीर मुनगंटीवारांनी माध्यमांना सांगितला. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर भाजपचं बारीक लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला कोणतीही ऑफर दिलेली नाही. भाजपकडे प्रस्ताव आल्यास बैठक घेऊन आम्ही विचार करू. शेवटी आमच्या पक्षात निर्णय घ्यायचा अधिकार कोअर टीमला आहे. त्यांनी जर प्रस्ताव दिला तर आमची कोअर टीम त्यावर विचार करुन निर्णय घेईल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

आजच्या बैठकीत सत्तास्थापनेबाबात कोणतीही चर्चा झालेली नाही. पण सध्या राज्यातल्या राजकीय अस्थिरतेवर भाजपचं बारीक लक्ष आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर आमची कोअर टीम त्यावर निर्णय घेईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सध्या आम्हाला महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची गरज वाटत नाही. आम्ही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. आम्ही शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांना बंडखोर समजत नाही. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही, मीडियाने त्यांना सिरियसली घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज