अ‍ॅपशहर

संकटात असलेल्या ठाकरे सरकारचा पोलिसांना दिलासा; ५० लाखांऐवजी २५ लाखांत घर मिळणार

बीडीडी चाळीत वास्तव्यास असलेल्या पोलिसांसाठी ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीडीडी चाळीत वास्तव्यास असलेल्या पोलिसांना ५० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांत घरं मिळणार आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2022, 2:39 pm

हायलाइट्स:

  • पोलिसांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
  • बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार
  • पोलिसांना ५० ऐवजी २५ लाखांत घर मिळणार
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bdd chawl
बीडीडी चाळ
मुंबई: शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्य सरकार संकटात आलं आहे. या परिस्थितीत ठाकरे सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. गृहनिर्माण विभागानं बीडीडी चाळ प्रकल्पातील पोलिसांना मोठा दिलासा दिला आहे. निवृत्त पोलिसांना ५० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांत घरं दिली जातील. यापूर्वी ही घरं ५० लाख रुपयांत देण्याची घोषणा झाली होती.
पोलिसांना ५० लाख रुपयांत घर देण्याच्या निर्णयावरून सरकारवर मोठी टीका झाली होती. यानंतर त्या घरांसाठीची किंमत ५० लाखांवरून २५ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. या प्रकल्पातील घरं पोलिसांनी रिक्त करावीत आणि प्रकल्प पुढे जाऊ द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

बीडीडी चाळीतल्या पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना हक्काच्या घरांसाठी ५० लाखांची किंमत जाहीर करण्यात आली होती. घरांची किंमत कमी करण्यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार, नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुंबईतील बीडीडी पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब कित्येक वर्षांपासून राहत आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर राज्य सरकारने निर्णय घेत पोलिसांना हे घर ५० लाख रुपयांतत मिळेल, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यावरून बरंच राजकारण झालं. त्यानंतर आता सरकारनं घरांची किंमत निम्म्यानं कमी केली आहे.

महत्वाचे लेख