अ‍ॅपशहर

मुंबईत बेस्ट बसच्या चालकांनी अचानक सुरू केले काम बंद आंदोलन; प्रवाशांचे हाल

या आंदोलनामुळे काही नियमित बस सेवा उपलब्ध न झाल्याने बेस्ट उपक्रमाने अन्य आगारातील बस या ठिकाणी वळवल्या आहेत. मात्र तरीही प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं पाहायला मिळालं.

Authored byहेमंत साटम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2022, 12:42 pm
मुंबई : बेस्टच्या कंत्राटी बसच्या चालकांनी आज सकाळपासून काही आगारात काम बंद आंदोलन पुकारलं आहे. पगार न झाल्याने कामगारांनी हे आंदोलन पुकारल्याची माहिती आहे. कामगारांनी अचानक सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Best Bus Strike In Mumbai)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम best bus strike
बेस्ट बस (फाईल फोटो)


कुर्ला, वांद्रे, विक्रोळी येथील आगारातील बेस्टच्या कंत्राटी बसच्या चालकांचा ठरलेल्या दिवशी पगार झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बस चालकांनी थेट काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे काही नियमित बस सेवा उपलब्ध झाल्या नसल्याने बेस्ट उपक्रमाने अन्य आगारातील काही बस सेवा या ठिकाणी वळवल्या. मात्र, तरीही या बससेवेवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज