अ‍ॅपशहर

भाऊबीजेच्या दिवशी बेस्टचा संप; नेत्यांचे उपोषण

बोनसच्या प्रश्नावर बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीने आक्रमक पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांना बोनस न दिल्यास ऐन भाऊबीजेच्या दिवशी शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. याआधी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पगार रखडल्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी संप पुकारला होता.

Maharashtra Times 16 Oct 2017, 4:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम best bus worker called strike for diwali bonus
भाऊबीजेच्या दिवशी बेस्टचा संप; नेत्यांचे उपोषण


बोनसच्या मागणीसाठी बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीने आक्रमक पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांना बोनस न दिल्यास ऐन भाऊबीजेच्या दिवशी शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. याआधी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पगार रखडल्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी संप पुकारला होता.

मागील काही दिवसांपासून बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्यावतीने बेस्ट प्रशासनाकडे बोनसची मागणी करण्यात येत होती. मात्र, त्यावर प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आज कृती समितीच्या बैठकीत एकदिवसाचा संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय बेस्टच्या वडाळा आगाराबाहेर १८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत ऐन दिवाळीतच कृती समितीचे नेते उपोषणाला बसणार असल्याची माहिती बेस्ट कामगार संघटनेचे नेते जगनारायण कहार यांनी दिली. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात असल्यामुळे आम्ही दिवाळीत उपोषण करणार आहोत. संपात उपक्रमातील ३२ हजार कर्मचारी सहभागी होणार असून एकही बस धावणार नसल्याचा दावा करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज