अ‍ॅपशहर

अगोदर शाहांना स्पष्टीकरण,राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याऐवजी मोदींना विनंती, कोश्यारींच्या मनात काय? चर्चा सुरु

Bhagat Singh Koshyari राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. मात्र, नियमानुसार राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त केल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत.

Authored byयुवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2023, 4:53 pm

हायलाइट्स:

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पदमुक्त होण्याची इच्छा
  • राष्ट्रपतींकडे राजीनामा न दिल्यानं चर्चा
  • राज्यपालांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bhagatsingh koshyari
भगतसिंह कोश्यारी
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात व्यक्त केलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रक्रियेप्रमाणं राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवणं आवश्यक होतं,अशा चर्चा आहेत. राज्यपा भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा नरेंद्र मोदींकडे व्यक्त केल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यामुळं राज्यपालांना खरंच पदावरुन पायउतार व्हायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळं वाद निर्माण झाले होते. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाले होते. मराठी माणसांसदर्भात केलंलं वक्तव्य देखील वादग्रस्त ठरलं होतं. त्यानंतर राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीनं आक्रमक भूमिका घेतली होती. मविआनं मुंबईत महामोर्चा देखील काढला होता. दरम्यानच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमित शाह यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट केली होती. आता नरेंद्र मोदींकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. मात्र, यावरुन देखील प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा, भगतसिंह कोश्यारी यांची मोदींकडे इच्छा व्यक्त

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

देवाघरची फुलं देवाघरी गेली, बहिणीमागून भाऊही शेततळ्यात बुडाला, सख्ख्या भावंडांचा करुण अंत

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हा तर बाळासाहेब ठाकरे यांनाच विरोध आहे; खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला

राजीनामा राष्ट्रपतींकडे न दिल्यानं चर्चा

भारतीय राज्यघटनेप्रमाणं राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून घटक राज्यांमध्ये काम करत असतात. राज्यपालांना राजीनामा द्यायचा असल्यास तो राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो. भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी अमित शाह यांना पत्र लिहिलं होतं. आता नरेंद्र मोदींकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, नियमानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा न दिल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मोदीजी आपल्याला विनंती, मला पदमुक्त करा, उर्वरित काळात चिंतन मनन करायचंय : राज्यपाल कोश्यारी
लेखकाबद्दल
युवराज जाधव
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम... आणखी वाचा

महत्वाचे लेख