अ‍ॅपशहर

सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले

भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनामुळे सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Maharashtra Times 13 Jun 2018, 12:00 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhaiyyu maharaj spiritual guru to top politicians commits suicide
सेवाभावी व्यक्तिमत्व हरपले


भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनामुळे सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भय्यूजी महाराज यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे. विशेषतः जलसंधारण, भूमी सुधारणा, शिक्षण क्षेत्रासह सामुहिक विवाह चळवळीतही त्यांनी लक्षणीय काम केले होते. विशेषतः महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हजारो हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे. त्यांच्या निधनाने समाजाला विधायक कामासाठी उद्युक्त करणारे प्रेरणास्रोत हरपले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज