अ‍ॅपशहर

राणा दाम्पत्याला मोठा दिलासा; खार येथील घराबाबत न्यायालयाने BMCला दिले निर्देश

पुढील आदेशापर्यंत कारवाई करण्यात येऊ नये, अशा सूचनाही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2022, 1:34 pm
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खार येथील घरासंदर्भात दिंडोशी न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला अर्ज करण्यास १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसंच पुढील आदेशापर्यंत कारवाई न करण्याच्या सूचनाही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravi rana and navneet rana
रवी राणा आणि नवनीत राणा


नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई महानगरपालिकेने खार येथील घराचं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या दोघांनीही न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आता राणा दाम्पत्याला एक महिन्याची मुदत दिली आहे.

Kapil Sibal: कपिल सिब्बल यांनी सोडला काँग्रेसचा हात; 'सपा'च्या मदतीने राज्यसभेवर जाणार

नेमकं काय आहे प्रकरण?

राणा दाम्पत्याचे मुंबईतील खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटीस पाठवल्या आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या पथकाने याबाबत तपासणी केली.

अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिशीला राणा दाम्पत्याने दिलेलं उत्तर अमान्य करत ७ ते १५ दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा आम्हाला याबाबत कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आला होता.

महत्वाचे लेख