अ‍ॅपशहर

चोरांनी दिला रणवीरच्या बाइकला लूक

रणवीर सिंह अभिनीत 'गुंडे' या सिनेमातील बाइकला आधुनिक लुक देणारेच सराईत बाइक चोर निघाल्याची माहिती समोर आली आहे. या बाइक चोरांची एक टोळीच मुंबईत सक्रिय असून त्यापैकी चार जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2018, 3:51 pm
मुंबई: रणवीर सिंह अभिनीत 'गुंडे' या सिनेमातील बाइकला आधुनिक लुक देणारेच सराईत बाइक चोर निघाल्याची माहिती समोर आली आहे. या बाइक चोरांची एक टोळीच मुंबईत सक्रिय असून त्यापैकी चार जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bike theft gang arrested by mumbai police
चोरांनी दिला रणवीरच्या बाइकला लूक


आरीफ खान, आसिफ खान, साहिल गांजा आणि मिलिंद सावंत असं या चौघा बाइक चोरांचं नाव आहे. या टोळीने मुंबई आणि आसपासच्या परिसरात वर्षभरात १०० हून अधिक बाइकची चोरी केली आहे. बाइकची चोरी करायची आणि त्यात संपूर्ण बदल करून त्याला आधुनिक लुक द्यायचा. त्यानंतर या बाइकची विक्री करायची असे कारनामे हे चोर करत होते, असं पोलिसांनी सांगितलं. अर्जुन कपूरच्या 'गुंडे' या सिनेमातील एका बाइकला आधुनिक लुक देऊन चित्रीकरणासाठी दिली होती, अशी कबुलीही आसिफने दिली. पोलिसांनी या टोळीकडून ५० बाइक ताब्यात घेतल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी आसिफला ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचं प्रचंड ज्ञान आहे. त्यामुळे तो चोरी करून आणलेल्या बाइकचं संपूर्ण स्वरूप बदलत असे आणि या बाइक प्रत्येकी २५ ते ३० हजारात विकत असे. या टोळीविरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज