अ‍ॅपशहर

कोल्हापूरच्या पुरावेळी राज ठाकरे कुठे होते?: चंद्रकांत पाटील

'कोल्हापुरात पूर आला तेव्हा मी तिथं पाय रोवून उभा होतो. तब्बल ५ लाख लोकांचं स्थलांतर केलं. राज ठाकरे त्यावेळी कुठे होते,' असा सवाल महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2019, 12:32 pm
मुंबई: 'कोल्हापुरात पूर आला तेव्हा मी तिथं पाय रोवून उभा होतो. तब्बल ५ लाख लोकांचं स्थलांतर केलं. राज ठाकरे त्यावेळी कुठे होते,' असा सवाल महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp leader chandrakant patil lashes raj thackeray over flood remarks
कोल्हापूरच्या पुरावेळी राज ठाकरे कुठे होते?: चंद्रकांत पाटील


वाचा: शिवसेना भाजपपुढे लाचार: राज ठाकरे

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज आपलं संकल्पपत्र प्रसिद्ध केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. 'राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशाऱ्यावर काम करतात,' असा चिमटा पाटील यांनी काढला.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी राज यांची जाहीर सभा झाली. यावेळी राज यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. विशेषत: चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती. 'कोल्हापूर, सांगलीत पूर आला आणि तिथला सरकारमधील एक मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला' असा टोला राज यांनी पाटलांना हाणला होता. पाटलांचा उल्लेख 'चंपा' असा गर्दीतून झाल्यानंतर या चंपाची चंपी मनसेचा येथला उमेदवार करेल, असंही राज म्हणाले होते.

राज यांच्या या टीकेचा चंद्रकांत पाटील यांनी आज समाचार घेतला. 'कोल्हापूरच्या पुरात मी पाय रोवून उभा होतो. तिथं लाखो नागरिकांचं स्थलांतर केलं. आता पुराबद्दल बोलणारे राज ठाकरे तेव्हा कुठे होते, असा सवाल पाटील यांनी केला.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

अशी होतेय निवडणूक

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज