अ‍ॅपशहर

राऊतांचा मुक्काम मलिकांच्या शेजारी व्हावा ही तर सोमय्यांची इच्छा; ईडी अटकेची कारवाई करणार?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक काही वेळापूर्वीच संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. ईडीनं यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2022, 8:19 am
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक काही वेळापूर्वीच संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. ईडीनं यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raut and kirit
संजय राऊत आणि किरीट सोमय्या


आता हिशोब देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीच्या धाडीवर दिली आहे. राऊत यांनी भ्रष्टाचार, लूटमार, माफियागिरी केली. आता या सगळ्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राऊत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ते राऊत यांचे पार्टनर झाले होते. मात्र आता राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. राऊत यांचा मुक्काम नवाब मलिकांच्या शेजारी असावा, ही माझी प्रार्थना आणि इच्छा असल्याचं सोमय्या म्हणाले.

प्राथमिक माहितीनुसार, ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले. याठिकाणी आल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडतीला सुरुवात केली आहे. सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ताब्यात घेतली जात असल्याचे समजते.

संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वीच चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण संजय राऊत दिल्लीत असल्याने ते ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. पण ईडीने त्यांची मागणी फेटाळत त्यांना नवीन समन्स दिले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहायला सांगितले होते. पण संजय राऊत तेव्हाही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ईडी थेट राऊत यांच्या घरीच पोहोचली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज