अ‍ॅपशहर

Sushant singh rajput case : सुशांतप्रकरणातील 'हा' युवा नेता कोण?; भाजपने केला नवा गौप्यस्फोट

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणात (Sushant singh rajput case) भाजपने (bjp) नवा आरोप केला आहे. सीबीआय प्रकरणात स्वत:ची इमेज उजळण्यासाठी एक युवा नेता स्वत:हून सीबीआय चौकशीला सामोरे जाणार असून हा संपूर्ण पीआर स्ट्रॅटेजीचा भाग असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2020, 7:58 am
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात स्वत:ची इमेज चमकवण्यासाठी एक युवा नेता स्वत:हून सीबीआय चौकशीला सामोरे जाणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपने या नेत्याचं आणि त्याच्या पक्षाचं नाव घेतलं नाही, मात्र संदिग्ध इशारा दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sushant singh rajput


भाजपचे नेते आणि प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी एक ट्विट करून हा गौप्यस्फोट केला आहे. एक तरुण नेता आपली इमेज वाचवण्यासाठी स्वत:हून सीबीआयसमोर चौकशीला जाईल. आपण काहीच केलं नाही, हे सिद्ध करण्याासाठी हा नेता सीबीआय चौकशीला सामोरे जाईल. अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हा पीआर स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे, असं नाखुआ यांनी म्हटलं आहे. नाखुआ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही. कोणत्याही पक्षाच्या दिशेने इशाराही केलेला नाही. तसेच सुशांतच्या कुटुंबीयांनीही सुशांतप्रकरणी आतापर्यंत कोणत्याही नेत्यावर आरोप केलेला नाही. त्यामुळे नाखुआ यांच्या ट्विटवर तर्कवितर्क व्यक्त केलं जात आहे.

धक्कादायक! मृत्यूपूर्वी सलग तीन दिवस सुशांतने ओढला होता गांजा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे गेलं आहे. सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा उलगडा करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत आली आहे. या टीमने सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंहची साक्ष नोंदवली आहे. त्यात सुशांतला गांजा ओढण्याचं व्यसन होतं आणि मृत्यूपूर्वी तीन दिवस आधी तो गांजा ओढत होता, असं म्हटलं आहे. मृत्युच्या काही दिवस आधी त्याने सुशांतसाठी गांजाचे रोल बनवून दिले होते. सुशांतचा मृतदेह आढळला त्या दिवशी त्याने चरस ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला. तेव्हा तो बॉक्स नीरजला रिकामा आढळून आला होता. हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नीरजने मुंबई पोलिसांना तीन पानांचा जबाब दिला आहे.

शवगृहात सुशांतचा मृतदेत पाहून रियाला अश्रु अनावर म्हणाली....

सुशांतप्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने मुंबईत दोन टीम तयार केल्या आहेत. एका टीमने वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन केस डायरी आणि दस्ताऐवज घेतले. तसेच सुशांतचा लॅपटॉप आणि फोनही ताब्यात घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या टीमने सुशांतच्या घराच्या डमी टेस्टची तयारीही केली आहे. एसपी अनिल यादव यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयची टीम पोलीस केसच्या फाइलचा तपास करत आहे. तर एसपी नुपूर यादव यांच्या नेतृत्वाखालील दुसरी टीम फॉरेन्सिक अॅनालिसीस करत आहे.

तुम्ही शवविच्छेदन का केलं? पनवेलच्या 'या' डॉक्टरांना त्रास

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज