अ‍ॅपशहर

'मी अर्णव गोस्वामींना भेटायला चाललोय, हिंमत असेल तर अडवून दाखवा'

रिपल्बिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) तळोजा (Taloja) कारागृहाकडे रवाना झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2020, 7:21 am
मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले 'रिपब्लिक टीव्ही'चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आल्यानंतर भाजप अधिकच आक्रमक झाला आहे. अर्णव यांची तात्काळ सुटका करा, अशी मागणी भाजपचे नेते करत आहेत. भाजपचे आमदार राम कदम हे अर्णवला भेटण्यासाठी निघाले असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला दिलं आहे. (Ram Kadam visits Taloja Jail)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Arnab Goswami


अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यापासून भाजपचे नेते सातत्यानं सरकारवर टीकेच्या तोफा डागत आहेत. मुंबईतील आमदार राम कदम हे अर्णव प्रकरणात पहिल्या दिवसापासून जोरदार आवाज उठवत आहेत. अर्णवच्या अटकेचा निषेध म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर वांद्रे ते सिद्धिविनायक मंदिर पायी चालत जाऊन अर्णव यांच्या सुटकेसाठी सिद्धिविनायकाला साकडे घातले. आज ते तळोजा कारागृहात अर्णव गोस्वामींची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.

वाचा: ब्राह्मण महासंघ एकनाथ खडसेंवर भडकला! माफीची मागणी

राम कदम यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 'अर्णव यांच्या जिवाला धोका आहे,' असा आरोप कदम यांनी केला आहे. 'अर्णव यांच्या केसालाही धक्का लागला तर त्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही. त्यांनी बळजबरीनं राज्यावर आणीबाणी लादली आहे,' असंही कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'अर्णव यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, महाराष्ट्र सरकार बरखास्त करा,' अशी मागणीही कदम यांनी केली आहे.

कोठडीत असताना मोबाइल फोनचा वापरल्यामुळं अर्णव यांना तळोजा तुरुंगात हलवण्यात आलं आहे. त्यांच्याकडे कोठडीत असताना मोबाइल फोन आला कुठून, कोणी दिला? याची चौकशी आता करण्यात येत आहे.

वाचा: रोहित पवारांना भावले चिमुकलीने दिलेले गिफ्ट, म्हणाले ‘थँक यू दिदी’

वाचा: अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड वाद उदयनराजेंच्या दरबारात

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज