अ‍ॅपशहर

माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाकरे सरकारमधील नेत्याचा फोन, माझ्याकडे पुरावे आहेत: रवी राणा

केवळ न्यायालयामुळे मला या प्रकरणात जामीन मिळाला. विधिमंडळात आम्ही कायदे तयार करतो, जनतेसाठी लढतो, तो आवाजच सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मी पेनड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आणले आहेत. हे पुरावे सादर केल्यानंतर त्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2022, 12:16 pm
मुंबई: अमरावती पालिका आयुक्तांवर शाईफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजप आमदार रवी राणा यांनी सोमवारी विधिमंडळाच्या परिसरात राज्य सरकारचा निषेध केला. रवी राणा (Ravi Rana) यांनी एक फलक झळकावून आपल्यावरील अन्यायाविरोधात दाद मागितली. तसेच मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि पोलीस आयुक्त आरती सिंग यांचे निलंबन करण्याची मागणीही रवी राणा यांनी केली. ९ तारखेला माझ्यावर ३०७ कलमातंर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्या नेत्याने फोन केला होता, पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे मला माहिती आहे. मी सर्व पुरावे माझ्यासोबत आणले आहेत, असे रवी राणा यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ravi-Rana
रवी राणा


केवळ न्यायालयामुळे मला या प्रकरणात जामीन मिळाला. विधिमंडळात आम्ही कायदे तयार करतो, जनतेसाठी लढतो, तो आवाजच सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मी पेनड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आणले आहेत. हे पुरावे सादर केल्यानंतर त्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी. मी मंगळवारी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने १२ सदस्यीय समिती स्थापन करावी. अमरावतीचे मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

अमरावतीमधल्या शिवाजी महाराज पुतळ्याचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात गाजतोय. अमरावती महापालिकेने परवानगी न घेता बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला गेला. त्याच वादातून महापालिका आयुक्त आष्टीकर यांच्यावर आमदार राणा यांनी शाईफेक केली. यानंतर राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अमरावती जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी जोशी यांनी आमदार राणा यांना जामीन मंजूर केला होता.

महत्वाचे लेख