अ‍ॅपशहर

कॅमेरे पाहून काल पवारांची भेट टाळली; आशिष शेलार आज पुन्हा 'सिल्व्हर ओक'वर

Mumbai Cricket Association Election : मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकमेकांना मदत करत असल्याचं याआधीही पाहायला मिळालं होतं.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2022, 10:48 am
मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या खासगी निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. खरंतर कालच ही भेट होणार होती. या भेटीसाठी शेलार हे काल या परिसरातही आले होते. मात्र माध्यमांचे कॅमेरे पाहून आशिष शेलारांनी पवार यांची भेट घेण्याचं टाळलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashish shelar sharad pawar meeting
आशिष शेलार - शरद पवार


एमसीए अध्यक्षपदासाठी २८ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. एमसीए निवडणुकीवर गेल्या काही दशकांपासून शरद पवार यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीआधी विविध पक्षाच्या नेत्यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही समावेश होता.

या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकमेकांना मदत करत असल्याचं याआधीही दिसून आलं होतं. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यातील मधुर राजकीय संबंध सर्वश्रूत आहे. या पार्श्वभूमीवर आज होत असलेली पवार-शेलार भेट महत्त्वाची मानली जात आहे.

शिरुर लोकसभा जागेवर भाजपचा उमेदवार, आढळराव पाटलांचं काय होणार?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोण-कोण स्पर्धेत?

एमसीए अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. १९८३ च्या विश्वचषक विजयात सिंहाचा वाटा उचलणारे संदीप पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संदीप पाटील हे शरद पवारांचे समर्थक आहेत. संदीप पाटील यांच्यासोबतच विजय पाटील, अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आणि नवीन शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख