अ‍ॅपशहर

सेनेला ११८ जागा देण्याची भाजपची तयारी

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात शिवसेनेने मागितलेल्या १३० जागांपैकी ११८ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र उर्वरित बारा जागांपैकी कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावर भाजपम आणि शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. यात मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर-मानखुर्द, उल्हासनगर जागांचा समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स 23 Sep 2019, 8:35 am
naresh.kadam@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena-bjp


मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात शिवसेनेने मागितलेल्या १३० जागांपैकी ११८ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र उर्वरित बारा जागांपैकी कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावर भाजपम आणि शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. यात मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर-मानखुर्द, उल्हासनगर जागांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून शिवसेना-भाजपच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शनिवारी रात्री चर्चा झाली. यात शिवसेनेने १३० जागांची यादी भाजपला दिली आहे. यातील ११८ जागांबाबत भाजपची कोणतीही हरकत नाही. त्यामुळे त्या जागांचा वाद संपलेला आहे. उर्वरित १२ जागांबाबत आता या दोन पक्षात खल सुरू आहे. मुंबईतील वडाळा, शिवाजी नगर- मानखुर्द, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या जागांबरोबर विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया तर पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल आदी जागांपैकी काही जागा शिवसेनेला हव्या आहेत. यातील शिवाजीनगर-मानखुर्दची जागा शिवसेनेला देण्यास भाजप तयार आहे. मात्र अन्य जागा सोडण्यास भाजप तयार नाही. या बारा जागांवर सध्या भाजप आणि शिवसेनेचे आमदार नाहीत.

दोन्ही पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या काही जागाची अदलाबदल करायची आहे. यात गोरेगाव, वांद्रे, चांदीवली, औसा आदी जागा आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज