अ‍ॅपशहर

विश्वास प्रस्ताव मंजूर; बागडेंना अभय

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विरोधकांचा डाव सत्ताधारी भाजपनं आज उधळून लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत अध्यक्षांच्या बाजूने विश्वास प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानाने हा विश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या या कुरघोडीचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2018, 1:18 pm
मुंबई: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विरोधकांचा डाव सत्ताधारी भाजपनं आज उधळून लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत अध्यक्षांच्या बाजूने विश्वास प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानाने हा विश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या या कुरघोडीचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp wins confidence vote
विश्वास प्रस्ताव मंजूर; बागडेंना अभय


विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे अध्यक्ष असतानाही एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाप्रमाणे वागत असून मनमानीपणे कामकाज रेटत आहेत. विरोधकांचा आवाज दाबून सदस्यांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्नही करत आहेत, आदी कारणे देत विरोधकांनी बागडे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. विधानसभा नियमानुसार येत्या दोन आठवड्यात अध्यक्षांचा अविश्वास प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी येईल. मात्र तत्पूर्वी अध्यक्षांनी नैतिकता दाखवून सभागृहात कामकाज करू नये. त्यांच्याजागी तालिका अध्यक्ष कामकाज करू शकतात. याबाबत बागडे यांनी सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या बाजूने आज विश्वास ठराव आणून विरोधकांवर कुरघोडी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज