अ‍ॅपशहर

रक्तचाचण्या होणार मोफत

शहरातील पालिकेच्या आरोग्यकेंद्रांमध्ये दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासोबतच विविध प्रकारच्या रक्तचाचण्याही निःशुल्क केल्या जाणार आहेत. गेल्यावर्षी पालिकेच्या आरोग्यविषयक अर्थसंकल्पामध्ये 'आपली चिकित्सा' या योजनेची घोषणा केली होती. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, या वर्षाच्या अखेरीपर्यंत मोफत रक्तचाचण्यांची सुविधा सुरू होणार आहे.

Maharashtra Times 30 Aug 2018, 2:53 am
Vijay Pandey 1 / Akhilesh.Pandey@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blood tests will be free
रक्तचाचण्या होणार मोफत


मुंबई: शहरातील पालिकेच्या आरोग्यकेंद्रांमध्ये दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासोबतच विविध प्रकारच्या रक्तचाचण्याही निःशुल्क केल्या जाणार आहेत. गेल्यावर्षी पालिकेच्या आरोग्यविषयक अर्थसंकल्पामध्ये 'आपली चिकित्सा' या योजनेची घोषणा केली होती. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, या वर्षाच्या अखेरीपर्यंत मोफत रक्तचाचण्यांची सुविधा सुरू होणार आहे.

या रक्तचाचण्या खासगी कंपन्याच्या मदतीने करण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल काही तासांमध्ये रुग्णांना उपलब्ध होईल. ही रुग्णसेवा घेणाऱ्या प्रत्येक रुग्णांच्या तपासणीसाठी लागणारे शुल्क या कंपनीला देण्यात येणार आहे. यापूर्वीही या रक्तचाचण्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती, मात्र त्यातील अनेक त्रुटींमुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली. पूर्वीच्या निविदा प्रक्रियेद्वारा एकाच पॅथालॉजीकडे हे काम देणे अपेक्षित होते. आता मात्र हे काम झोननिहाय देण्यात आले असून, प्रत्येक विभागासाठी तीन वेगवेगळे कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.

यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आय़ुक्त ए. कुंदन यांनी दिली, तर या तपासण्या सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळेल, असे समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्पष्ट केले.

पालिकेची आरोग्यसेवा

१७५ दवाखाने

२८ प्रसूतीगृहे

१६ उपनगरीय रुग्णालये

६ विशेष रुग्णालये

४ प्रमुख रुग्णालये

या तपासण्या होणार...

थायरॉइड, व्हिटॅमिन डी, सीबीसी, सीरम क्रियाटीन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज