अ‍ॅपशहर

होळीआधीच शिवसेना-भाजपचा शिमगा

मुंबई महानगरपालिका साहेबांची खासगी मालमत्ता नाही, मुंबईकर जनतेची आहे, ती आम्ही आता परत घेणार, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गिरगावच्या प्रचारसभेत म्हणाले. तर शिवसेनेने टेकू दिला म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. वरळी आणि परळ येथे ठाकरे यांच्या तर गिरगाव आणि प्रभादेवी येथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या आणि त्यात आरोप-प्रत्यारोपांचे तुंबळ युद्ध रंगले.

Maharashtra Times 10 Feb 2017, 10:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc elections 2017 cm and uddhavs allegations and counter allegations in rallies
होळीआधीच शिवसेना-भाजपचा शिमगा


मुख्यमंत्री पालिकेचे म्हणजे आमचेच पाणी पितात, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर मी किती पाणी पितो याची काळजी नको, मुंबई महानगरपालिका साहेबांची खासगी मालमत्ता नाही, मुंबईकर जनतेची आहे, ती आम्ही आता परत घेणार, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गिरगावच्या प्रचारसभेत म्हणाले. तर शिवसेनेने टेकू दिला म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. वरळी आणि परळ येथे ठाकरे यांच्या तर गिरगाव आणि प्रभादेवी येथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या आणि त्यात आरोप-प्रत्यारोपांचे तुंबळ युद्ध रंगले.

मुख्यमंत्र्यांना आम्हीच पाणी पाजतो, म्हणजे असं काल उद्धव ठाकरे म्हणाले होते, त्याला मराठी माणसांची काळजी करणाऱ्यांनी आधी गिरगावकरांना पाणी द्यावे, असा प्रतिटोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 'शिवसेनेत सर्वाधिक गुन्हेगारांचा भरणा आहे. शिवसेनेचे ६३ उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत, ८१ जणांवर गंभीर गुन्हे आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळेच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. २४४५ कोटी रुपयांचे रस्ते मुंबईत आहेत, पण त्या रस्त्यांवरची क्रस्ट लेयरच गायब असल्याने ते एक वर्षदेखील टीकणार नाहीत,' अशा आरोपांच्या फैरी मुख्यमंत्र्यांनी आज सभांमध्ये झाडल्या.

उद्धव ठाकरे यांनी,'केलेली कामे आणि दावे खोडून दाखवा, खुले आव्हान देतोय, मुख्यमंत्र्यांशी जुगलबंदी करायला आजही तयार आहे,' असे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले. ते म्हणाले, 'गुजरातची अवस्था उच्च न्यायालायाने बिहारपेक्षा वाईट ठरवली आहे. मुंबईला पाटणा ठरवून फडणवीसांनी पोलिसांचा अपमान केला. मराठी मते नाहीच, मात्र मुंबईचा पाटणा केला म्हणून बिहारी मतेही मुख्यमंत्र्यांनी गमावली. पुढच्या राजकारणाची दिशा महापालिका निवडणुकीचा निकाल बदलेल,' असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज