मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश या बंगल्याची मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली होती. यावेळी अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या के-वेस्ट वॉर्डचे अधिकारी याचा एक अहवाल तयार करतील. त्यानंतर नारायण राणे यांना नोटीस पाठवली जाईल. ही नोटीस पाठवल्यानंतर पालिका नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई करणार का, हे पाहावे लागेल. (BJP Union minister Narayan Rane bunglow in Juhu) मुंबई महानगरपालिकेच्या नऊ अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी अधीश बंगल्याची जवळपास दोन तास पाहणी केली होती. यावेळी पाचव्या मजल्यावरील रिफ्यूज एरियामध्ये बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बंगल्यातील अंतर्गत बांधकाम नाही, किरकोळ प्रमाणात अंतर्गत बदल करण्यात आल्याची माहिती आहे. हे बदल किरकोळ असल्याने नारायण राणे यांना एमआरटीपी ५३ अंतर्गत नोटीस दिली जाणार आहे. या नोटीसनंतर अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी एका महिन्याचा अवधी दिला जातो. याशिवाय, इमारत प्रस्ताव विभागाकडे दंड भरून आणि शिल्लक एफएसआय वापरून हे बांधकाम नियमित करून घेता येते.
चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावरही कारवाईची टांगती तलवार
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील चिवला बंगल्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले होते. निलरत्न या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे हा आदेश राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून आला आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा निलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, नितेश राणे यांनी निलरत्न बंगल्याविषयी आमच्या हातात कोणतीही नोटीस आली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ही नोटीस खरंच केंद्रातून आली आहे किंवा राज्यातील पर्यावरण खात्यानेच या कुरापती केल्या आहेत का, याचा आम्ही शोध घेत असल्याचे नितेश यांनी म्हटले होते.