अ‍ॅपशहर

महापालिकेने डावलले अहिल्याताई रांगणेकरांचे नाव

दादरच्या हिंदू कॉलनीजवळ उभारण्यात आलेल्या एका उड्डाणपुलास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या दिवंगत अहिल्याताई रांगणेकर यांचे नाव देण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतरही काँग्रेस नगरसेविकेच्या अट्टहासामुळे या पुलास माजी महापौर दिवंगत नानालाल मेहता यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे. मुंबईच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहिल्याताईंचे मोठे योगदान असतानाही त्यांचे नाव डावलण्यात आल्याने दादर भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Maharashtra Times 14 May 2016, 4:47 am
राज्य सरकारच्या आदेशानंतरही दादरच्या उड्डाणपुलास नाव नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc rejects name of ahilya ranganekar for flyover
महापालिकेने डावलले अहिल्याताई रांगणेकरांचे नाव

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

दादरच्या हिंदू कॉलनीजवळ उभारण्यात आलेल्या एका उड्डाणपुलास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या दिवंगत अहिल्याताई रांगणेकर यांचे नाव देण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतरही काँग्रेस नगरसेविकेच्या अट्टहासामुळे या पुलास माजी महापौर दिवंगत नानालाल मेहता यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे. मुंबईच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहिल्याताईंचे मोठे योगदान असतानाही त्यांचे नाव डावलण्यात आल्याने दादर भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दादरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दत्तात्रय नाडकर्णी चौक ते किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केटपर्यंतचा उड्डाणपूल एमएमआरडीएने बांधून पालिकेला हस्तांतरित केला आहे. या पुलास अहिल्याताई रांगणेकर यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौर सुनील प्रभू यांना पत्र पाठवून अहिल्याताईंच्या नावाची शिफारस केली. प्रभू यांनी पालिकेच्या एफ-उत्तर विभागास अंमलबजावणी करण्यास सांगितले.

हिंदू कॉलनीतील एक सामाजिक कार्यकर्ते उदय नाडकर्णी यांनीही याप्रकरणी एफ-उत्तरमध्ये पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यानच्या काळात हिंदू कॉलनीतील काँग्रेस नगरसेविका नयना शेठ यांनी नानालाल मेहता यांचे नाव देण्यासाठी एफ-उत्तर प्रभाग समिती, स्थापत्य समिती (शहर) आणि पालिका सभागृहात मांडलेला प्रस्ताव मंजूर झाला. या पुलाचा नामकरण सोहळा रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबत नयना शेठ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हा प्रस्ताव प्रशासकीय कार्यवाहीनुसार मंजूर झाला असल्याचे सांगितले.

जुना लहान उड्डाणपूल होता तेव्हा त्यास मेहता यांचे नाव होते. त्यानंतर पूल पाडून त्याचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यामुळे नवीन नाव देण्याचा प्रश्नच उद‍्भवत नाही. मेहता हे या भागात राहत होते तसेच २२ वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

- नयना शेठ, स्थानिक नगरसेविका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज