अ‍ॅपशहर

वाऱ्यामुळे झाड पडल्याने महिलेचा मृत्यू: पालिका

चेंबूर येथे झाड पडून महिला ठार झाल्याच्या घटनेची जबाबदारी महापालिकेने झटकली आहे. वाऱ्यामुळे या महिलेच्या अंगावर झाड पडले असून त्याला पालिका जबाबदार नसल्याचं सांगत महापालिकेने या घटनेला वाऱ्यालाच जबाबदार धरलं आहे. पालिकेच्या या अजब तर्कटामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Maharashtra Times 13 Nov 2017, 10:55 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc reports on coconut tree collapse on woman in chembur
वाऱ्यामुळे झाड पडल्याने महिलेचा मृत्यू: पालिका

चेंबूर येथे झाड पडून महिला ठार झाल्याच्या घटनेची जबाबदारी महापालिकेने झटकली आहे. वाऱ्यामुळे या महिलेच्या अंगावर झाड पडले असून त्याला पालिका जबाबदार नसल्याचं सांगत महापालिकेने या घटनेला वाऱ्यालाच जबाबदार धरलं आहे. पालिकेच्या या अजब तर्कटामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

चेंबूर येथे राहणाऱ्या कांचन दास या २० जुलै रोजी योगा क्लास आटोपून स्वास्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटीसमोरून जात असताना सोसायटीतलं नारळाचं झाडं अचानक त्यांच्या अंगावर कोसळलं होतं. त्यामुळे काही काळ त्या झाडाखाली दबल्या होत्या. जखमी झालेल्या कांचन यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यातही आलं होतं. पण तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे धोकादायक झाडांच्या प्रश्नांवरून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात होता. महापालिकेनेही या घटनेची गंभीर दखल घेऊन उद्यान विभागाला या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उद्यान विभागाने अहवाल सादर केला असून वाऱ्यामुळे झाड कोसळून ही दुर्घटना झाली आहे. त्याला पालिका जबाबदार नाही, असं पालिकेने या अहवालात स्पष्ट केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज