अ‍ॅपशहर

वाहनचालकांना दिलासा! अवैध पार्किंग दंड कमी होणार

रस्त्यांवर अवैध पार्किंग केल्यास चारचाकी वाहनांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय महापालिकेकडून लवकरच मागे घेण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. महानगरपालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेतील अधिकारी सध्या वेगवेगळ्या पर्यांयांची चर्चा करत आहेत. या चर्चेतून योग्य पर्याय निघाल्यावर दंडाची ही रक्कम हजार रुपांवर येणार आहे.

Chaitanya Marpakwar | मुंबई मिरर 20 Dec 2019, 4:33 pm
मुंबई: रस्त्यांवर अवैध पार्किंग केल्यास चारचाकी वाहनांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय महापालिकेकडून लवकरच मागे घेण्यात येणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. महापालिकेकडून परिपत्रक जारी करून दंडाच्या नव्या रकमेची माहिती देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम car


महानगरपालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेतील अधिकारी सध्या वेगवेगळ्या पर्यांयांची चर्चा करत आहेत. या चर्चेतून योग्य पर्याय निघाल्यावर दंडाची ही रक्कम हजार रुपांवर येणार आहे. पार्किंग दंडात बदल करण्यात येत असल्याच्या वृत्ताला महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरुवारी दुजोरा दिला. ते म्हणाले, ' आम्ही यासंदर्भात सध्या काम करत आहोत आणि लवकरच दंडाच्या नव्या रकमेबाबत माहिती देणारं एक नवीन परिपत्रक काढण्यात येईल.'

रस्त्यांवर व रस्त्यांलगत गाड्यांचे अवैध पार्किंग केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होते. त्यामुळे महापालिकेच्या पार्किंग स्थळापासून एक किमीच्या अंतरातील 'नो पार्किंग झोन'मध्ये गाड्यांचे अवैध पार्किंग केल्याचे आढळल्यास दहा हजार रुपये दंड ठोठावला जातो. दंड न भरल्यास संबंधित वाहन 'टोइंग मशीन'द्वारे उचलून नेले जाणार येते. ७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.

वाहनळांची संख्या अपुरी असल्याने या दंडात्मक कारवाईला मुंबईकरांनी विरोध केला. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कारवाईत कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार देत तो स्थानिक प्रशासनाचा म्हणजे पालिकेचा प्रशासकीय अधिकार असल्याचे सांगत त्या पातळीवरच नागरिकांनी दाद मागावी, अशी सूचना केली व कारवाई थांबवण्याची मागणी फेटाळून लावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज