अ‍ॅपशहर

सेनेच्या ‘सुवर्णमहोत्सवी’ जाहिरातींवर गुन्हे

शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक ठिकाणी केलेल्या जाहिरातींवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचा ठपका ठेवून होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत.

Maharashtra Times 23 Jun 2016, 4:08 am
शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचा पालिकेचा ठपका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc takes action on hoardings of golden jubilee celebration of shivsena
सेनेच्या ‘सुवर्णमहोत्सवी’ जाहिरातींवर गुन्हे


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक ठिकाणी केलेल्या जाहिरातींवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचा ठपका ठेवून होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत.

शिवसेनेने पालिकेची परवानगी न घेता सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरात रस्ते, फूटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर जाहिरात करणारे होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनर लावले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पालिकेच्या परवानगीशिवाय जाहिरातींचे होर्डिंग्ज लावण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने जाहिरातींबाबतचे नियम कठोर केले असून, परवाना शुल्क भरल्याशिवाय परवानगी दिली जात नाही.

सुवर्णमहोत्सवानिमित्त शिवसेनेने बोरीवली भागात लावलेल्या होर्डिंग्जसाठी पालिकेची परवानगी घेतली आहे का, याबाबत सामाजिक कार्यकर्ते शरद यादव यांनी आर-मध्य पालिका प्रभाग कार्यालयाकडे माहिती मगितली होती. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात शिवसेना शाखा क्रमांक १५ तर्फे बोरीवली पश्चिम येथील जयराज नगर, परांजपे कॉलनी, अशोक नगर, वझिरा नाका, एल.टी. रोड, डॉन बॉस्को हायस्कूल, चंदावरकर लेन, डॉन बॉस्को सिग्नल, एक्सर रोड व व्हेज ट्रीट रॉयल या परिसरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आर-मध्य विभागाच्या परवाना विभागातर्फे १४ जून रोजी होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ अन्वये होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे पत्र पालिकेने बोरीवली पोलिस ठाण्याला दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज