अ‍ॅपशहर

Sanjay dutt: अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग; उपचारांसाठी परदेशात जाणार

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तची करोना चाचणीही करण्यात आली होती. (Sanjay Dutt diagnosed with lung cancer)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2020, 11:54 pm
मुंबईः बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोगाचं निदान झालं आहे. त्याचा कर्करोग तिसरा टप्प्यातला असून तो लवकरच अमेरिकेत उपचारांसाठी रवाना होणार असल्याचं कळतंय. अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यानं संजय दत्तच्या प्रकृतीसंदर्भात ट्विट केलं आहे. (Sanjay Dutt diagnosed with lung cancer)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay dutt



काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळं मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची करोना चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. उपचारांनतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.


रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय दत्तनं कामातून ब्रेक घेतला असल्याचंही जाहीर केलं होतं. तसं एक ट्विटही त्यानं केलं आहे. उपचारांसाठी मी नेहमीच्या कामातून छोटीशी सुट्टी घेत आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवार माझ्यासोबत आहेत. त्यामुळं उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवू नका. तुमचे प्रेम आणि शुभेच्छांमुळं मी लवकरच परत येईन, असा विश्वास आहे. असं ट्विट संजय दत्तनं केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज