अ‍ॅपशहर

पिंटो परिवाराला देश सोडण्यास मनाई

रायन इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक ऑगस्टिन फ्रान्सिस पिंटो, त्यांची पत्नी आणि रायन ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो आणि मुलगा व शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांना देशाबाहेर जाण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 9:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bombay high court bars pinto family from leaving india ordered to submit passports
पिंटो परिवाराला देश सोडण्यास मनाई


रायन इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक ऑगस्टिन फ्रान्सिस पिंटो, त्यांची पत्नी आणि रायन ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो आणि मुलगा व शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांना देशाबाहेर जाण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे. या तिघांनीही आजच मुंबई पोलीस आयुक्तांकडे आपले पासपोर्ट जमा करावेत, असे आदेशही हायकोर्टाने दिले.

हायकोर्टाने पिंटो परिवाराचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळला. त्याचवेळी पासपोर्ट जमा करण्यात आल्यास या तिघांच्या अटकेस उद्या, शुक्रवारपर्यंत मनाई करण्यात येईल, असे नमूद केले.

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या दुसऱ्या इयत्तेतील प्रद्युम्न ठाकूर गळा चिरून हत्या करण्यात आल्यानंतर रायन ग्रुप अडचणीत आला आहे. या ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी असलेला बस कंडक्टर तसेच २ अधिकाऱ्यांना अटकही झालेली आहे. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी रायन ग्रुपचे मालक असलेल्या पिंटो परिवाराची धडपड सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज