अ‍ॅपशहर

फिल्मसिटीत सापडली हरणाची हाडे

चित्रनगरीमधील बिबळ्या आणि सांबर हे वन्यजीव मृतावस्थेत सापडल्या प्रकरणी कसून तपास सुरू आहे. या प्रकरणात रविवारी घटनास्थळी हरीणाच्या शरीराची हाडे आणि तोंडाचा काही भाग सापडल्याचे उघड झाले आहे.

30 8 Jan 2019, 4:00 am
घटनास्थळी सापडली हरणाची हाडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम film-city


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

चित्रनगरीमधील बिबळ्या आणि सांबर हे वन्यजीव मृतावस्थेत सापडल्या प्रकरणी कसून तपास सुरू आहे. या प्रकरणात रविवारी घटनास्थळी हरीणाच्या शरीराची हाडे आणि तोंडाचा काही भाग सापडल्याचे उघड झाले आहे. त्यावरून या प्राण्यांची खाण्यासाठी हत्या केली जात असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.

या प्रकरणी रविवारी रात्री संदेश भवरे या स्थानिकाला अटक केली असून आता अटकेतील आरोपींची एकूण संख्या सहा झाली आहे. हा आरोपी क्रमांक तीस पाड्यावरील रहिवासी आहे. या सहाही जणांना सोमवारी बोरिवली येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची कोठडी दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने नऊ जानेवारीपर्यंत वनखात्याच्या कोठडीची शिक्षा सुनावली. यासंदर्भात आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. मात्र ते चौकशीमध्ये फार सहकार्य करत नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज