अ‍ॅपशहर

पालिकेची अध्ययन निष्पत्ती चाचणी रद्द

शहरातील पालिका शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती अध्ययन निष्पत्तीवर प्रभूत्व मिळवले याची सराव चाचणी सोमवारी घेण्यात आली.

Maharashtra Times 12 Oct 2018, 4:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bmc


शहरातील पालिका शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती अध्ययन निष्पत्तीवर प्रभूत्व मिळवले याची सराव चाचणी सोमवारी घेण्यात आली. यामध्ये गोंधळ झाल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागाने ही चाचणी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दर महिन्याच्या १ तारखेला चाचण्यांचे आयोजन करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र पहिल्या चाचणीमध्येच गोंधळ निर्माण झाल्याने यावर टीका झाली. यामुळे पालिका शिक्षण विभागाने ही सराव चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज