अ‍ॅपशहर

पवई तलावाजवळ बस उलटली, १ ठार

पवई तलावजवळ एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

Maharashtra Times 20 May 2017, 3:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bus accident nera powai lake one died on the spot
पवई तलावाजवळ बस उलटली, १ ठार


पवई तलावजवळ एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

विक्रोळीच्या दिशेनं जाणारी बस पवई तलावाजवळ उलटली. अपघात नेमका कसा झाला, हे कळू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. पाच जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज