अ‍ॅपशहर

मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला झुकते माप; कोणत्या विभागातून कोणाला संधी?

State Cabinet Expansion News : मंत्रिपदाच्या स्पर्धेत विदर्भ काहीसा मागे राहिल्याचं पाहायला मिळालं असून केवळ दोन नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 12:30 pm
मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राला ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती तो विस्तार आज पार पडला असून राजभवनात नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी शिंदे गटातील नऊ आणि भाजपमधील नऊ अशा एकूण १८ जणांचा शपथविधी पार पडला. महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी कसरत करावी लागली आहे. दुसरीकडे, अनेक दिग्गज नेते स्पर्धेत असताना मोजक्या नेत्यांनाच पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची संधी देताना भाजप नेतृत्वाचीही मोठी कसोटी लागली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम state cabinet expansion 1
मंत्रिमंडळ विस्तार


शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई आणि कोकण पट्ट्यातून चार नेत्यांना मंत्रिपदे मिळाली आहे, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातूनही चार नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाच्या स्पर्धेत विदर्भ मात्र काहीसा मागे राहिल्याचं पाहायला मिळालं असून विदर्भातील केवळ दोन नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मंत्रिमंडळात विदर्भातील वजनदार नेते असले तरी आज झालेल्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात मात्र इतर विभागांच्या तुलनेत विदर्भातील कमी नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढील टप्प्यात ही कसर भरून काढली जाईल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LIVE मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधीला सुरूवात, विखे पाटील यांनी घेतली सर्वप्रथम शपथ

कोणत्या विभागातून कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?

मुंबई- कोकण :

उदय सामंत,
दीपक केसरकर,
मंगलप्रभात लोढा,
रवींद्र चव्हाण,

मराठवाडा :

अब्दुल सत्तार,
संदीपान भुमरे,
अतुल सावे,
तानाजी सावंत,

उत्तर महाराष्ट्र :

गुलाबराव पाटील,
दादा भुसे,
गिरीश महाजन,
विजयकुमार गावित

पश्चिम महाराष्ट्र :

चंद्रकांत पाटील,
शंभूराज देसाई,
राधाकृष्ण विखे पाटील,
सुरेश खाडे


विदर्भ

संजय राठोड,
सुधीर मुनगंटीवार.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख